अहमदनगर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे देशात उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. दरम्यान धार्मिक स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, धार्मिक स्थळे सुद्धा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद असल्याने, ती उघडी करा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.
मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील. https://t.co/RNAKWBWoH4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 15, 2020
दरम्यान, पुनश्च हरिओमच्या घोषणेनंतर देशात अनलॉकची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे उद्योगधंदे, दुकाने खुली करण्यास सरकारकडून परवानगी मिळाली होती. मात्र धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता त्यामुळे राज्यसरकार आता रोहित यांची मागणी पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘आपल्याकडे दातेंसारखे पत्रकार आहेत पण मोदीजी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना …’
‘धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास होता’
धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली ‘ही’ मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

