Share

बीड जिल्ह्यात ‘रेमडेसिवर’ इंजेक्शनचा काळाबाजार!

Published On: 

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत ही मोठी वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काळाबाजारी करणारे पुढे सरसावले आहेत. रुग्णासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवर इंजेक्शनची कृत्रिम टंचाई भासवून दुप्पट-तिप्पट दराने विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रडारवर आले आहेत.

कोरोना रुग्णाच्या फुफ्फुसावर संसर्गाचे प्रमाणानुसार रेमडेसिवर इंजेक्शन द्यावे लागतात. काही रुग्णांना दोन इंजेक्शववर भागते तर काही जणांना सहापेक्षा अधिक इंजेक्शन द्यावे लागतात. सुरुवातीला एका इंजेक्शनची किंमत चार हजार २०० रुपयांपर्यंत होती, आता ती कमी झाली असून साधारण नऊशे रुपयांपर्यंत इंजेक्शन उपलब्ध होते. शासकीय कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन मोफत मिळते;परंतु खसगी हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांना त्याचे पैसे मोजावे लागतात.

साधारण नऊशे रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात कृत्रिम टंचाई भासवून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत विक्री केले जाते, अशा आशयाच्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाकडे आलेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने आता जिल्हा पोलीस प्रशासन सजग झाले असून अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करता येईल का, यादृष्टीने विचार सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!