🕒 1 min read
पालघर : काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 29, 2021
जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचार सभेत पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला, त्यासाठी जादा निधीही दिला.
आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजपा सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरु केली. भाजपाने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस ९०० रुपये झाला, एवढा महाग गॅस गरिबांना परवत नाही त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तु बनून राहिली आहे.
यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपाचा डाव आहे. सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी आहे व यापुढेही राहिल.’ असे स्पष्ट मत यावेळी बोलताना नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार – वडेट्टीवार
- महिला शिल्पकाराचा कमाल…पवारांचा ९ फूट उंच मेटलचा पुतळा साकारला; सुळेंनी केलं कौतुक
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
