🕒 1 min read
पुणे : पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळा साकारला आहे. यासाठी सुप्रिया शिंदे याचं सर्वत्र कौतुक केल जात आहे. त्यांनी शरद पवार यांचा 9 फुट उंच मेटलचा पुतळा बनवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी या पुतळ्याची पाहणी केली.
पुण्यातील आंबेगाव परिसरात पवारांचा पुतळा साकारला जातोय. तसंच सुप्रिया शिंदे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील बालपणीचा मेटलचा पुतळा बनवला आहे. पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी लागला. रोज 10 तास काम करुन हा पुतळा साकारल्याच शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी यावेळी सांगितलं . यासाठी त्यांना दीड टन मेटलचा वापर करावा लागला असल्याचे समजते.
इंटरनेटवर पवारांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून हा पुतळा साकारला असल्याचं त्या म्हणाल्या. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रिया शिंदे यांना आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या शिल्पकलेसाठी तीन पुरस्कार मिळाले आहेत.
पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे. pic.twitter.com/I0FIHWCJfh
— Supriya Sule (@supriya_sule) September 27, 2021
यासाठी सुप्रिया सुळे यांनी त्यांच कौतुक केल असून त्या म्हणाल्या, ‘पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे,’ अशा शब्दात त्यांनी सुप्रिया शिंदे याचं कौतुक केल.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- ‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
