Share

पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार – वडेट्टीवार

Published On: 

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.

मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रातील सोयाबीन मातीमोल झाले आहे. तर कापसासह इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने तीन दिवसांत पिक नुकसानीचे पंचनामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत भाष्य केलं आहे. गेल्या दोन दिवसात मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसामुळे 11 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. तर राज्यात आतापर्यंत नुकसानाचे पूर्ण पंचनामे झाल्यावर आकडेवारीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळं राज्यात किती जिल्हे बाधित झालेत याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करायचं की नाही याचा निर्णय घेऊ असं विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे नदी, नाले यांचे प्रवाहच बदलून गेलेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यासोबतच वर्षभरात आलेल्या आपत्तींबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही केंद्र सरकारनं कोणतीही ठोस अशी मदत केली नाही, अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!