Share

गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं

Published On: 

मुंबई : राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. शिवसेनेतील नेते आणि राणे कुटुंबीय परस्परांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आज बुधवारी गोवा दौऱ्यावर जात आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने आपण तेथे जात असल्याची माहिती राऊत यांनी दिली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘संजय राऊत जिथे जिथे जातात तिथे आमची सत्ता येते. बेळगावमध्ये काय झाले? आज मी देवाचे आभार मानले की त्यांच्यावर अशीच जबाबदारी दे. कारण हा माणूस सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचं काम करत आहे,’ अशी बोचरी टीका राणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, ‘गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावं. कारण त्यांना माहिती आहे की गोव्याचा किती छान विकास झालाय,’ असा टोला देखील राणे यांनी लगावला आहे.

शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार – राऊत

‘महाराष्ट्र आणि गोव्याची संस्कृती जवळपास सारखी आहे. ते महाराष्ट्राच्या जवळचे राज्य आहे. पण, आता तिथे पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसने प्रवेश केला आहे. मग, आम्ही का नाही लढणार?. गोव्यातील भाजप सरकार नवनवीन थापा मारतात. त्यांना मतदारांनी अद्दल घडवणे आवश्यक आहे. तो धडा शिवसेना पक्ष शिकवू शकतो. गोव्यात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू. तिथे संघटनाची गरज आहे,’ असं म्हणत शिवसेना २२ जागा लढवणार असल्याची माहिती देखील राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!