मुंबई : यष्टीरक्षकाच्या हुशारीचा अनेकदा संघाला फायदा होतो. असाच काहीसा प्रकार भारत आणि श्रीलंका (INDW vs SLW) महिला संघांमधील मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान घडला. भारतीय विकेटकीपर यास्तिका भाटियाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
यास्तिकाने पालेकल येथे मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची यष्टीरक्षक अनुष्का संजीवनी हिला तिच्या अप्रतिम थ्रो आणि चपळाईमुळे पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचाने आऊटचा निर्णय दिला. अनुष्का श्रीलंकेसाठी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. तिने ४४ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.
Brilliant glove work by Yastika Bhatia in the second ODI. pic.twitter.com/FKLoT23q63
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2022
या सामन्यात श्रीलंकेचा (INDW vs SLW) १० गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेच्या संघाने प्रथम खेळताना केवळ १७३ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून स्मृती मानधनाच्या ९४ आणि शफाली वर्माच्या ७१ धावांच्या जोरावर भारताने २६व्या षटकात एकही विकेट न गमावता विजय मिळवला. ४ विकेट्स घेतल्याबद्दल रेणुका सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

