Share

सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपन झेंडा फडकावला आहे. रांजणगाव शेनपुंजी ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला. 17 पैकी 14 ठिकाणी विजय भाजपचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी रांजणगाव शेनपुंजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर लासुर स्टेशन ग्रामपंचायतीवर देखली आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचे वर्चस्व निर्माण झाले आहे .लासूर स्टेशनमध्ये १६ जागांवर भाजपच्या पॅनलला विजय मिळाला आहे. तर मागील २० वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील तळणी ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे माजी सभापती अशोक गरुड यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकून त्यांच्या ७ जागा निवडून दिल्या.

पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावात नारीशक्तीचा प्रभाव दिसून आलाय. ढाकेफळ गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली होती. त्याचा परिणाम म्हणुन हा विक्रम पहायला मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!