औरंगाबाद : कोविड-19 विषाणु प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित आहे. कोरोना आजारापासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वत: लस टोचून घेतल्यानंतर केले.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे नोंदणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ.विजया सोनवणे व इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
लस टोचून घेतल्यानंतर केंद्रेकर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असल्याने मी स्वत: लस टोचून घेतली आहे. ही लस टोचून घेणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. आरोग्य क्षेत्रात फ्रंटलाईनवर काम करणाऱे आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, इतर सर्व शासकीय अधिकारी – कर्मचारी ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनी जरूर लस टोचून घ्यावी.
कोणत्याही लसीकरणाबाबत सुरुवातीला जनमाणसात संभ्रम असतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतही काही नागरिकांत समज-गैरसमज असणे गैर नाही. यासाठीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी मी स्वत: लस घेतली आहे, तेंव्हा सर्वांनी कारोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, असेही केंद्रेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांनी चालत्या गाडीतून आमचे सदस्य ओढत नेले, भाजपचा आरोप
- ‘शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’
- शरद पवारांचा देखील कृषी कायद्यांना पाठींबा ? खुद्द नरेंद्र मोदींनीच दिला दाखला
- मला मूर्ख बनवून राम मंदिरासाठी देणगी घेतली,कॉंग्रेस आमदाराने मागितली मुस्लीम समुदायाची माफी
- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद; फडणवीसांचं आकडेवारीतून प्रत्युत्तर


