हिंगोली: औरंगाबाद- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरुन हिंगोलीकडे ऑक्सिजन घेऊन जात असलेला टँकर उलटला. यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लीक झाले. या घटनेमुळे तब्बल दोन तास औंढा- जिंतूर मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. टँकरच्या दुरुस्तीला दोन तास लागले दुरुस्तीनंतर हे टँकर हिंगोलीकडे रवाना करण्यात आले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
औंढा नागनाथ तालुक्यातून औरंगाबाद नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा नदीवरील पूल अरुंद असल्याने औरंगाबाद येथून हिंगोलीसाठी ऑक्सिजन टँकर घेऊन येणाऱ्या चालकाला त्याचा अंदाज आला नाही. अचानक नियंत्रण सुटल्याने १६ टायर असलेले हे टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. चालक व इतर दोघांनी उड्या घेऊन जीव वाचविला. परंतु टँकरमधील ऑक्सिजन लीक झाले. प्रवाश्यांना गॅस असल्याची भीती वाटल्याने धावपळ झाली होती. परंतु वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांना हायसे वाटले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या साहयाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला.
या बाबत तहसीलदार कृष्णा कानगुले, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, पोलिस उप निरीक्षक गणेश राठोड यानी भेट दिली. अपघातानंतर रस्त्याचा दोन्ही बाजूनी वाहनांच्या रंगा लागल्या होत्या. दोन ते अडीच तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाही झाली त्यामुळ मोठी हानी टळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अयोध्येतील जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला झोडपून काढले
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- विद्यार्थ्यांच्या ‘फी’चा पालकांवरील बोजा कमी करण्यासाठी सुनील शेळकेंची भेगडेंना साद !
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

