तुळजापूर : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शेतीचं मोठं नुकसान झालं असून हाताशी आलेलं सोन्यासारख्या पिकासोबतच शेतातील माती देखील वाहून गेल्यानं पुन्हा उभा राहायचं तरी कसं ? असा गंभीर प्रश शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते देखील विविध भागांचा दौरा करत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच दर्शन घेत राज्यातील संकटातून जनतेला मुक्त कर अशी प्रार्थना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद असल्यानं खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील मंदिराबाहेरूनच दर्शन घेऊन आरती देखील केली.
दरम्यान, मंदिरं खुली करण्यासाठी गेले २ महिने आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजपने याच मुद्द्यावर हात घालत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ट्विट करून ठाकरेंना टोला लगावला आहे.
‘दारूची दुकानं आधीच खुली केली…. मात्र आई तुळजा भवानी चे दर्शन मंदिरा बाहेरून घेतले….! यातून मुख्यमंत्री महोदय नेमक काय सुचवू पाहतात ? कदाचित आपली प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची सोय मंदिरं खुली करून भारतीय जनता युवा मोर्चालाच करावी लागेल असे वाटते.’ असं म्हणत विक्रांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधून मंदिरं खुली करण्याकडे लक्ष वेधून घेतलं आहे.
दारूची दुकानं आधीच खुली केली….
मात्र आई तुळजा भवानी चे दर्शन मंदिरा बाहेरून घेतले….! ????????
यातून मुख्यमंत्री महोदय नेमक काय सुचवू पाहतात ?कदाचित आपली प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची सोय मंदिरं खुली करून भारतीय जनता युवा मोर्चालाच करावी लागेल असे वाटते.@zee24taasnews pic.twitter.com/0kCTs1YPnf
— Vikrant Balasaheb Patil (@ivikrantpatil) October 21, 2020
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी ; ३० लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस
- धडाकेबाज अजितदादा क्वारंटाईन ; प्राथमिक लक्षणं दिसल्याने घेतला निर्णय !
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा
- नाथाभाऊ करणार दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन , राष्ट्रवादीचा आनंद गगनात मावेना
- ‘पवारांनी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

