कोल्हापुर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा चेहरा करण्यासाठी राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांनी देशभरात मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ते सध्या देशभरातील दिग्गज नेत्यांच्या बैठका घेत आहेत.नुकतीच त्यांनी काँग्रेससोबतही याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का देण्यासाठी प्रशांत किशोर रणनिती आखत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
सध्याच्या घडीला प्रशांत किशोर यांनी सध्या देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी बैठकांचा सपाटा लावल्याच्या मुद्द्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी कोल्हापुरात भाष्य केल आहे.’२०२४ मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची खिल्ली उडवली.
‘आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असा वारंवार रिपोर्ट येत आहे. दर तीन ते सहा महिन्यांनी नरेंद्र मोदी याचा फिडबॅक घेत आहेत. आता फिडबॅक घेण्याची गरज नाहीये. कारण नागरिक आनंदी आहेत’, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.