Share

गृहखातं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? फडणवीसांचा सवाल

Published On: 

नागपूर : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी अशांतता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील विविध नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. तर, शरद पवार यांची पत्रकार परिषद संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधतानाच शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. ‘ गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. तसेच, गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये या नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे,’ अशी मागणी देखील फडणवीसांनी केली आहे.

‘सरकारचे कसे आहे… आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू, फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, महाराष्ट्रद्रोही अशा टीका केल्या जातात. आता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही,’ असं देखील फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!