Share

‘सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यामुळेच महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा डाव’

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राजीनामा दिल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. यांच्या समर्थनार्थ दिग्रस मतदारसंघात मोर्चादेखील निघालेला आहे. त्यामुळे चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही. भाजपची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही घडलं की महाविकास आघाडी बदनाम कशी होईल, यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे,’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

भाजप आक्रमक !

मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!