कोलकाता: पुढील वर्षी देशातील पाच राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून रणनीती आखण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे. बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार यंत्रणा आणि पक्ष कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. तृणमूलचे नेते सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार भाजपाच्या वाटेवर आहे, असा दावा भाजपाच्या खासदारानं केला आहे. या दाव्यामुळे बंगालमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचे पडघम आतापासून वाजायला लागले आहेत. भाजपानं बंगाल विशेष लक्ष दिलं आहे. तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचं दिसत असून, भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूलचे पाच खासदार राजीनामा देणार असल्याचा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहेत. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील जगद्दल घाटावर छटपूजेनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमात खासदार अर्जून सिंह हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सौगत रॉय हे तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
सिंह म्हणाले,”मी पुन्हा पुन्हा सांगतोय की, तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार कोणत्याही क्षणी पक्षाचा राजीनामा देतील. त्यानंतर हे पाच खासदार भाजपात प्रवेश करणार आहेत,” असा दावा त्यांनी केला. सौगत रॉय यांचंही नाव या यादीत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सिंह म्हणाले,”सौगत रॉय हे तृणमूलचे आणि ममता बॅनर्जी यांच्यातील मध्यस्थ म्हणून स्वतः कॅमेऱ्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुवेंधू अधिकारी यांच्याही चर्चा केली आहे. पण, एकदा कॅमेरा बाजूला सरकारल्यानंतर तुम्ही सौगत रॉय यांचंही नावही समाविष्ट करू शकता,” असं अर्जून सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींनी घेतला कोविड-19 लसीचे वितरण, वाटप आणि व्यवस्थापनाचा आढावा
- पालघर प्रकरणावरून राम कदम पुन्हा आक्रमक, जनआक्रोश यात्रा काढून करणार सरकारचा निषेध
- मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं – चंद्रकांत पाटील
- सूर्या तू थांबू नकोस… निवड न झाल्यानंतर सचिनने दिला होता खास सल्ला
- मोठी बातमी : अमली पदार्थ सेवन प्रकरणात भारती सिंहनंतर तिच्या पतीलाही अटक


