Share

भाजपला लातुरात हादरा! जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्हा बँकेत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद केल्याचा आरोप करत भाजपाने राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेस प्रणीत सहकारी पॅनलचे ४ उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. तर उर्वरित १५ जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांचे ३१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी आहे.

पहिल्यांदाच या निवडणुकीत भाजपाप्रणित पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अर्ज छाननीत या पॅनलचा एकही अर्ज टीकला नाही. त्यामुळे काँग्रेस ही निवडणूक जिंकल्यात जमा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, जळकोटचे मारोती पांडे, चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. सहकार पॅनलचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख हे बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!