🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करून महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. ‘हर हर महादेव अब तांडव होगा’ असे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याकडे जाणार आहे. हे ट्विट सेव्ह करा असेही कंबोज यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे संकेत कंबोज यांनी दिले आहेत. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला टोला लगावला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मराठी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून, ईडीच्या चौकश्या लावून थकले आहेत. आता त्यांचा स्टॉक संपला. त्यामुळे मोहित कंबोज समोर आले आहेत. जो अत्याचार, ईडीची कारवाई सर्वांवर होत आहे. हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. योग्यवेळी जनता यांना उत्तर देईल, असे भास्कर जाधव म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी-
भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली आहे. या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. १२५ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य ती पाऊले उचलायला पाहीजे होती. तात्काळ मदतीचा निर्णय घ्यायला हवा होता. परंतू तशा प्रकारची कोणतीही मदत झाली नाही. सरकारने फक्त घोषणा केल्या. मात्र घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे या अधिवशेनात सरकारने तात्काळ ठोस मदत शेतकऱ्यांना करावी.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | “कंबोज पुराव्यांविना बोलत नाहीत, आजपर्यंत त्यांनी…”; आशिष शेलारांकडून समर्थन
- Allocation of funds | भाजपने शिंदे गटाला निधी देण्यातही डावललं!, शिवसेनेची खोचक टीका
- Ashish Shelar | आदित्य ठाकरे भाजपच्या मतावर निवडून आलेत – आशिष शेलार
- Monsoon Session | “50 खोके एकदम ओके!, आले रे आले गद्दार आले…” ; विरोधकांची घोषणाबाजी, धनंजय मुंडे जोशात
- Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला होणार अटक?; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
