🕒 1 min read
BJP | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य बघणाऱ्याला दाखवलेल्या हातावरून उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. याला भाजप (BJP) पक्षाचे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःचं भविष्य माहिती नसलेल्या नेत्यांना लोकांचं भविष्य काय कळणार, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते.
यावेळी, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना अश्वासन दिल्यानंतर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातील परिस्थिती आहे, असा टोला उन्मेश पाटील यांनी लगावला आहे.
तसेच, सत्तेत असताना उद्धव ठाकरे, अजित पवार यांना शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू आली नाही असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाण साधला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि भाजपच्या या वक्तव्यावरून हे वातावरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांनी वीज बिलं भरलेली नसल्याने त्यांनी वीज कनेक्शन तोडली होती. त्यावेळी ही संवदेनशीलता का दाखवण्यात आली नाही, आता देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर मात्र कोणत्याही शेतकऱ्याची कनेक्शन तोडली जात नसल्याचं उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Ahir | “कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं…”, सचिन अहिर यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…
- Uday Samant | “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…”, उदय सामंत संतापले
- Sanjay Gaikwad | “…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू”, संजय गायकवड यांचं ओपन चॅलेंज
- BJP | “एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे, तो कुणाच्या गालावर…”, भाजपच्या ‘या’ नेत्याचं ठाकरेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
