Sachin Ahir | मुंबई : गुवाहाटील कमाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. यावेळी मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना, कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडले आहे हे जनताच ठरवेल, असं म्हटलं आहे. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून कोणताही मंत्री कोणत्याही खात्यावर बोलतो. उद्योगमंत्री कृषी खात्यावर बोलतात, मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत की उद्योग करणारे मंत्री आहेत?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.
भाजपचे 105 आमदार खासगीत सत्ता कोणासाठी आणि कशासाठी असल्याचे विचारतात. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना स्वतःचे भविष्य बघण्यात रस आहे. संपूर्ण महाराष्ट्र व जनतेचे ते काय भविष्य बघणार ?, असा सवाल देखील अहिर यांनी केला आहे.
दरम्यान, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेलं आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…
- Uday Samant | “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…”, उदय सामंत संतापले
- Sanjay Gaikwad | “…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू”, संजय गायकवड यांचं ओपन चॅलेंज
- BJP | “एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे, तो कुणाच्या गालावर…”, भाजपच्या ‘या’ नेत्याचं ठाकरेंना प्रत्युत्तर
- Sudhir Mungantiwar | “…तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू”, सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार


