मुंबई : संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत. काँग्रेस हायकमांडने अद्याप महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र पटोले यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अशातच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘पुढच्या वेळी महा विकास आघाडीला बहुमत मिळताना मारामार नी काँग्रेसला स्वबळावर सत्तेची स्वप्ने पडताहेत’ असा टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.
"काँग्रेस पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार"…
पुढच्या वेळी महा विकास आघाडीला बहुमत मिळताना मारामार नी काँग्रेसला स्वबळावर सत्तेची स्वप्ने पडताहेत… https://t.co/ysKTpoeB9D— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 22, 2021
काय म्हणाले होते नाना पाटोले ?
‘आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल’ असे सूचक वक्तव्य पाटोले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
- पोलीस आयुक्त ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांची कामगिरी ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- उद्धव ठाकरे ‘संपत्ती’ आणि धनंजय मुंडे ‘संतती’ लपवतात – किरीट सोमय्या
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

