Share

Lata Mangeshkar Biography: ‘नाचू या गडे…’ या मराठी गाण्याने झाली लता मंगेशकरांच्या करिअरला सुरुवात

Published On: 

मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर या १३ वर्षाच्या असताना वडिलांचे छत्र हरपले. १९४२ साली त्यांचे वडील दीनानाथ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरची परिस्थिती हालाखीची होती. आई आणि आपली चार भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी दीदींवर येऊन पडली. या काळात मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रे आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाची मदत केली. त्यांनी लता मंगेशकर यांना वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी गाण्याची आणि अभिनयाची संधी दिली. वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले. या मराठी गाण्यापासूनच दिदींच्या करिअरला सुरुवात झाली.

‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे मराठी गाणे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केले होते. त्यानंतर लता दिदींनी भूमिका केलेला ‘पहिली मंगळागौर’ हा चित्रपटही प्रचंड गाजला झाला. या चित्रपटात लता दिदींनी दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं एक गीत गायलं होतं. १९४५ साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली.

उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. इथेच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘पा लागू कर जोरी’ हे पहिले गीत दीदींनी गायले. एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदींना नंतरची तालीम घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक गाण्याला श्रोत्यांनी प्रचंड डोक्यावर घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!