🕒 1 min read
जळगाव : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. तर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. हे सरकार जनतेच्या विश्वासघातातुन आले असून कोरोना स्थिती हाताळण्यात देखील अपयशी ठरले आहे. हे सरकार स्वतःच्या कर्माने पडेल असं भाकीत देखील फडणवीसांनी वर्तवलं होतं.
सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. तर, भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नाही. सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल, अशी टीका एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी केली होती.
नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात.
विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार.
निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल .@EknathGKhadse @Rohini_khadse @Dev_Fadnavis https://t.co/ZneiBNtHCQ— Ram Satpute (@RamVSatpute) April 18, 2021
त्यांच्या या टीकेला भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.’ असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे.
- …आणि सामनावीर एबी डिव्हीलीयर्स झाला भावूक
- हि@## भाजपच्या लोकांनी माझ्यासमोर येऊन दाखवावं; आमदार गायकवाडांची पुन्हा एकदा जीभ घसरली
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- देशात युद्धजन्य परिस्थिती, जनतेत संभ्रम आणि तणाव; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी
- पॉईंटमॅनच्या प्रसंगावधानाने वाचला चिमुकल्याचा प्राण; पहा थरारक व्हिडीओ !


