Share

मनसेने महाराष्ट्राला दिले नवे पप्पू…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई/ प्राजक्त झावरे-पाटील : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू या नावाने त्यांचे सर्व विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात. गेल्या महिन्यातील संसदेतील भाषणात स्वतः राहुल गांधींनी देखील ते कबूल केले होते. संबंध देशभर पप्पू हा शिक्काचं जणू त्यांच्यावर विरोधकांनी मारला होता. परंतु महाराष्ट्रात मनसेने नवीन पप्पू ला जन्म दिला असून ते दुसरे तिसरे कोण नसून ते आहेत पूर्वाश्रमीचे मनसेचे व सध्याचे भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम.

भाजपा आमदार राम कदम यांना पप्पू म्हणत आणि त्यांच्या विरोधात बॅनर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. प्रजा फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भाजपाचे आमदार राम कदम यांचे स्थान ३२ वे म्हणजेच शेवटचे आहे. आता राम कदम यांच्याबाबत ही माहिती समजल्यावर मनसे हात साफ करणारच, कारण राम कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

राम कदम जेव्हा मनसेत होते तेव्हा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या कामगिरीत त्यांना शेवटचे ठरवले गेल्याने मनसेने त्यांची खिल्ली उडवली. घाटकोपर मध्ये प्रत्येक चौका-चौकात त्यांचे खिल्ली उडवत चिमटा काढणारे हे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही संदर्भ देण्यात आला आहे. पप्पू कान्ट डान्स साला| गोविंदा आला रे आला| पप्पू कान्ट डान्स साला| तुमचे अभिनंदन असे खिल्ली उडवून चिमटा काढणारे बॅनर राम कदम यांच्या घरासमोर देखील लावण्यात आले आहेत.

काय आहे प्रजा फाऊंडेशनचा अहवाल?

प्रजा फाऊंडेशनने दोन दिवसांपूर्वीच एक अहवाल सादर केला. २०१६ ते २०१७ दरम्यान चार अधिवेशनात आमदारांनी काय कामगिरी केली? याची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे. या अहवालानुसार काँग्रेसचे मुंबईतील आमदार आमिन पटेल यांना पहिला क्रमांक देण्यात आला आहे. सेनेचे सुनील प्रभू दुसऱ्या स्थानी तर भाजपाच्या राम कदम यांना शेवटचा म्हणजेच ३२ वा क्रमांक देण्यात आला आहे. या अहवालात सेनेचे सर्वाधिक १३ आमदार आहेत. या अहवालातील क्रमांकावरूनच राम कदम यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवली आहे. घाटकोपरमधले हे बॅनर सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात रवानगी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!