🕒 1 min read
Sushma Andhare | पुणे : महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी इशारा दिला होता. “असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून हाणलं पाहिजे”, असं राम कदम म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलंच सुनावलं आहे.
“रामभाऊ तुम्हाला हे परवडणारं नाही. आमचा नाद परवडणारा नाही. आम्ही भटके बाबासाहेबांचे संविधान मानणारे आहोत. पण वेळ आल्यास पायाच्या दोन बोटांमधे दगड पकडून मागच्या मागे माणूस आऊट करण्याची ताकद आमच्यात आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तूफान फटकेबाजी केली आहे.
दरम्यान, आज विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) देखील या मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय,” असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sushma Andhare | “त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर…”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Udayanraje Bhosale | नूपुर शर्मा यांचं निलंबन, मग राज्यपाल कोश्यारींवर कारवाई का नाही? – उदयनराजे भोसले
- PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Sanjay Raut | “…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

