Share

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात रवानगी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए १९८१) मतीन यांच्यावर कारवाई केली आहे. मतीन यांची एका वर्षासाठी हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मागील आठवड्यात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली.

त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरक्षः खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी चपलेने मारले.

आता तरी खात्री पटली का व्यंगचित्र मीच रेखाटतो – राज ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!