Share

विलियम्सच्या लहान मुलीसोबत फोटो शेअर करत वॉर्नरने केली भावनिक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमध्ये नवीन संघ मिळाले आहे. सनरायझर्स हैदराबादच्या माजी कर्णधाराला आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. वॉर्नरने हैद्राबाद संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या वर्षी त्याचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते.

वॉर्नरनंतर न्यूझीलँडचा कर्णधार केन विल्यमसनला स्पर्धेच्या मध्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. केनला २०१८ च्या मोसमातही जबाबदारी स्वीकारली लागली होती, जेव्हा वॉर्नर ‘सँडपेपरगेट’ वादात अडकल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. केन आणि वॉर्नर यांची मैत्री हैद्राबादमुळे चांगली झाली आहे. आता वॉर्नर संघ सोडून जात असताना त्याने केनसाठी भावनिक पोस्ट केली आहे. त्याने केन आणि त्याच्या लहान मुलीसह फोटो शेअर केला. “विल्यम्सनससोबत मी ब्रेकफास्ट करणे मिस करेल. आणि तुझ्यासह क्रिकेट खेळणेही केन”

https://www.instagram.com/p/CaB_OcgLafC/?utm_source=ig_web_copy_link

डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैद्राबादसाठी इतिहासातील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ९५ डावांमध्ये ४०१४ धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीत त्याने दोन शतके आणि चाळीस अर्धशतके केली. वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्समधून केली होती. अवघ्या दशकानंतर वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्सच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या दिल्ली संघात परतणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!