Share

‘सरकार आजचं दुखणं उद्यावर ढकलत आहे’; एमपीएससी परीक्षांच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराचा निशाणा

Published On: 

पुणे : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सारासार विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

तर, मंत्री छगन भुजबळ व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या परीक्षा पुढे ढकलण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडं, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरला आहे.

याविषयी पुण्यातील शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना सरकारच्या नियोजनावर ताशेरे ओढले आहेत. ‘विषयांना सामोरं न जाता ते टाळले जात आहेत. अशा प्रश्नांमध्ये सरकार गांभीर्याने लक्ष देत नसून कालांतराने या सर्व समस्या सरकारच्या अंगलट येणार आहेत’ असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. आता, ‘पाणी डोक्यावरून गेलं असून सतत विषय टाळत राहणं हे योग्य नसल्याचं’ सांगत त्यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अडचणींवर व भविष्याच्या अनिश्चिततेवर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!