Share

संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे सद्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत चाणक्य म्हणून ओळखले जातात. काही मागण्यांमुळे भाजपशी असलेल्या संसार मोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. २०१९ निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात घडलेलं राजकीय नाट्य हे अविस्मरणीय आहे.

या सर्व घडामोडींमागे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांची देखील महत्वाची भूमिका राहिली होती. संजय राऊत यांना हृदयाचा आजार असून मागील वर्षी सत्तास्थापनेच्या घडामोडीतच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा ते या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आज त्यांना रुग्णालयातून सोडलं असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेताना, डॉक्टरांनी काही सल्ले दिले आहेत का? असा प्रश्न केला असता त्यांनी, ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हेच आमचे डॉक्टर असून आता काँग्रेस देखील सहभागी झाली आहे’ असं विधान केलं.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वैद्यकीय क्षेत्राने देखील नाराजी व्यक्त केली होती. मात्र, उपचारानंतर त्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून शरद पवार व उद्धव ठाकरे हेच डॉक्टर असल्याच्या विधानाची चर्चा होत आहे.

काय होत संजय राऊतांच ‘ते’ वक्तव्य?

खासदार संजय राऊत यांनी एका चॅनेलवरील मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या मेडिकल क्षेत्रातील ज्ञानावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे मेडिकल क्षेत्रातील ज्ञान अफाट असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टरांना काय कळत, अस विधान केलं होतं. तर, ‘डॉक्टरांपेक्षा कंपाउंडर बरे’ असं देखील ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!