मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिन्याभरापासून जोर धरू लागली आहे.
तर याच मुद्द्याला धरून सध्या भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे. ‘कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत हे सिद्ध होत असून हे जनहितासाठी की मतासाठी आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत या दुटप्पी भूमिकेबद्दल यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंजू बॉबी जॉर्जने टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेच्या यशाचे मोदी सरकारला दिलं श्रेय
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

