Share

अंजू बॉबी जॉर्जने टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेच्या यशाचे मोदी सरकारला दिलं श्रेय

Published On: 

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगीरी केली आहे. टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ४ कांस्य, २ रौप्य आणि १ सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत इतके पदक यापुर्वी कधीच जिंकले नव्हते. यापुर्वी भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सहा पदकांची कमाई केली होती.

टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशाचे संपुर्ण श्रेय हे मोदी सरकारला जाते असे वक्तव्य माजी महिला खेळाडू अंजु बॉबी जॉर्ज यांनी केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या. मोदी सरकार खेळांडुना प्राथमिकता देत आहे. पदक जिंकल्यानंतर थेट पंतप्रधान त्यांना फोन करुन त्यांचे अभिनंदन करतात, असे म्हणाली. यावेळी बोलताना अंजु बॉबी जॉर्जने तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली,’आमच्यावेळी क्रीडामंत्री ऑलिम्पिक विलेजला भेट द्यायचे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही माझे अभिनंदन केले होते.’ असे तीने सांगितले.

यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली,’जेव्हा मी वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकले होते तेव्हा भारतात खुप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र मत्रांलयाकडून काही खास घडले नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अभिनंदन केले होते. बस्स एवढचं. मात्र आता पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधणार आहे. त्यांना पराभवानंतरही फोन करतात. त्यांना पाठबळ देत आहे. यापुर्वी हे कधीच घडलं नव्हतं.’ असे ती म्हणाली. अंजु बॉबी जॉर्जने २००३ साली झालेल्या जागतीक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!