🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोना झपाट्याने पसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच या कोरोनाच्या लाटेत अनेक बड्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. राज्याची त्यातल्या त्यात मुंबईची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र हे निर्बंध आणि नियम केवळ सामान्य नागरिकांनाच लागू असल्याचे दिसत आहे.
कोरोना पासून वाचण्यासाठी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर ज्यांच्या तोंडाला मास्क नसेल त्यांना ५०० रुपये दंड देखील ठोठावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण हे नियम सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत असे दिसते. कारण राजकीय नेते विनामास्क बिनधास्त फिरताना दिसत आहेत.
मेरा चलता फिरता घुमता … लोगों के बीच का कार्यालय…
माझे चालते फिरते कार्यालय … जागच्या जागी समस्या निवारण… pic.twitter.com/Ksil6Fgl4A
— Ram Kadam (@ramkadam) January 8, 2022
भाजप नेते राम कदम यांना तर कोरोनाचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तोंडाला मास्क नाही तसेच कुठलेच सामाजिक अंतर न ठेवता हे निर्धास्तपणे बाहेर फिरत आहेत. तसेच इतर लोकांना देखील भेटत आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करत फोटो देखील शेअर केले आहेत. ट्विट करत त्यांनी म्हणलं आहे, माझे चालते फिरते कार्यालय… जागच्या जागी समस्या निवारण. समस्या निवारण करताना कोरोनाची समस्या होऊ शकते याचा विसर भाजप नेते राम कदम यांना पडलेला दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोविड सेंटर ठाकरे सरकारचे कमाईचे साधन’; किरीट सोमय्या यांची टीका
- ‘तेजस्वी प्रकाशचे वागणे आवडत नाही..’ म्हणणाऱ्या करण कुंद्राच्या बहिणीचे ट्वीट चर्चेत
- भाजप नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण
- “भित्रा व्यक्ती देशाचं नेतृत्व करु शकत नाही”, काँग्रेसचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
- किरीट सोमय्यांच्या आरोपांवर पेडणेकरांचे उत्तर; म्हणाल्या,’खुर्चीत गांजा मारून…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
