Share

“तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटापर्यंत घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देर आये दुरुस्त आए …असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जुन्या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर करत टीका केली आहे. तुम्ही खरे बोलता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

भाजप-शिवसेना सत्तेत असतांना आदित्य ठाकरेंनी केलेले ट्विट उपाध्ये यांनी शेअर केले आहे.  ८ मार्च २०१९  म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे ट्विट असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची वचनपूर्ती असे म्हणत ५००  फुटापर्यंतची कर्जमाफी संबंधित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले होते. दरम्यान, “नेमकं खरे कोण ? तुम्ही की उद्धव ठाकरे ? कारण दोन वर्षापूर्वीच तुम्ही आभार मानले होते”, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!