🕒 1 min read
मुंबई : मुंबई बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व राहिले असून दरेकरांच्या सहकार पॅनेलने सर्व २१ जागांवर विजय दणदणीत विजय मिळवला आहे. यातील १७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज(३ जाने.) पार पडली. ज्यात दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले.
याच पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले आहेत की,’मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला.’ तसेच नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले आहे,असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, मध्यवर्ती ग्राहकमतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला असून विठ्ठल भोसले यांना १८ मतं तर सुखदेव चौगुले यांना १६ मतं मिळाली आहेत. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मतं तर कमलाकर नाईक यांना ५९ मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मतं तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मतं मिळाली आहेत. तसेच भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना ४ हजार मते मिळाली असून यलाप्पा कुशाळकर यांना ३५० मते मिळाली.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
