टीम महाराष्ट्र देशा : पंकजा मुंडे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे, परंतु धनंजय मुंडे हे बोगस नेते आहेत, त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेचे वाटोळे झाले होते, आता पुन्हा ते मतासाठी तुमच्या दारात येत आहेत, त्यांच्या नादी लागून मतदारसंघाचे वाटोळे करून घेऊ नका अशी टीका जि.प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी राडी येथे केली आहे. पंकजा मुंडे यांच्या जवळगांव व राडी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केल आहे.
तर सत्तेच्या माध्यमातून मी मतदारसंघात कोट्यवधीचा निधी देऊन रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, बचतगट भवन, महिलांचे सक्षमीकरण हे सगळं केलं, विकासाची कामे करण्याबरोबरच लोकांच्या बदल्यांची कामे असो, आरोग्याची कामे असो की इतर अनेक किरकोळ कामे केली, विरोधक यावरून जे आरोप करतात ते बिनबुडाचे आहेत. सत्ता असताना राष्ट्रवादीने विकासासाठी फुटकी कवडी देखील नाही असा घणाघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.
दरम्यान, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव बावणे हे राडी येथे व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांनी पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा दिला. पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये आपल्या भागाचा विकास करण्याची धमक आहे, त्या सरकारच्या माध्यमातून या भागाचे नंदनवन करतील म्हणूनच माझा त्यांना पाठिंबा आहे असे ते म्हणाले. दरम्यान, राडी व जवळगांव येथे ना. पंकजाताई मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. सभांना मतदारांनी मोठी गर्दी करून ताई, तुम्ही विक्रमी मतांनी विजयी व्हाल, आम्ही राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून देऊ असा विश्वास दिला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1184367759049670656?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184365937522143232?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184365105221259264?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184363189107970051?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

