Share

आझादी गोरो से भी ली अब चोरो से भी लेंगे ; जितेंद्र आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  कानडी नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र ‘काँग्रेस नेत्यांनी डी.के शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. त्यामुळे आता डीके शिवकुमार आणि अन्य कॉंग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला.

जेंव्हा जेंव्हा या देशात बळजबरीने स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेत डांबून ठेवण्यात आलं तेंव्हा या देशाने आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले. त्या गोऱ्यांपासून घेतले, आता चोरांपासून सुद्धा घेणार, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेते डी.के शिवकुमार मुंबई येथे आले होते. मात्र ‘काँग्रेस नेते डी.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,’ असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहील्याने डी.के शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी अडवले होते. कॉंग्रेसच्या आमदारांना भेटू दिले नाही. यावेळी हॉटेल बाहेर गोधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी मिलिंद देवरा आणि डी.के शिवकुमार यांना ताब्यात घेतले.त्यावेळी आव्हाड यांनी ही टीका केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!