टीम महाराष्ट्र देशा : खासदार झाल्यावर मी पहिल्याच अधिवेशनात तीनवेळा बोललो. तर यापूर्वीचे खासदार तीन अधिवेशनानंतर बोलले होते, अशी टीका अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली आहे. अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये मोडणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
गेली 15 वर्ष प्रश्न सुटले नाहीत आणि ते मार्गी देखील लागले नाहीत. म्हणून शिरूरच्या मतदारांनी बदल घडवला आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरवांवर निशाणा साधला आहे. काही विकासकाम सुरू केल्याचा त्यांनी चुनावी जुमला केला होता, असं म्हणत अमोल कोल्हेंनी नाव न घेता आढळरावांवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकी आधीचं राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी भाजपकडे धाव घेतली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा नाजूक परिस्थितीतून पक्षाला सावरण्यासाठी शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहे.
६ ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. तर खुद्द अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाची मोठी जबाबदारी आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोदी-शाह राहणार उपस्थित
‘गड आला पण सिंह गेला’, आढळरावांच्या पराभवावर नीलम गोऱ्हेंची खंत
नाले, गटारं साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : साध्वी प्रज्ञा सिंह
…म्हणून मी भाजपात आलो, शिवेंद्रराजेंनी दिले पक्षांतराचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

