🕒 1 min read
मुंबई: सध्या उत्तर प्रदेशातील आयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून राम मंदिरांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेमध्ये पहिली वर्गणी देत मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लवकरच राम मंदिर निर्माण सुरू होणार आहे.
दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यालयात मध्ये श्री रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची यावेळी उपस्थिती होती. यावर भाजप कार्यालयात श्री रामांची मूर्ती स्थापन करण्यात आल्या नंतर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे. ‘भगवान श्रीराम माता सीते शिवाय अपूर्ण नाहीत का? जर माता सीतेच हरण झालं नसतं तर रावणाचा वध झाला असता का? सत्याच्या लढाईत माता सीतेच काहीच योगदान नाही का? दुःख होतं या पुरुषप्रधान संस्कृतीच्या विचारांच्या भाजप राम आणि सीता यांना वेगळं करत आहेत. हाच प्रयत्न रावणाने पण केला होता.’ अशी टीका प्रियंका यांनी केली आहे.
क्या भगवान श्री राम, माँ सीता के बिना अधूरे नहीं?
अगर माँ सीता का हरण ना होता क्या रावण का वध होता?
क्या सच्चाई की लड़ाई में माँ सीता का कोई योगदान नहीं?
दुख होता है कि पुरुष प्रधान सोच को लेकर भाजपा राम को सीता से ही अलग करने में लग गयी है।
यही प्रयास रावण ने भी किया था। https://t.co/oscIrx1Mqb— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) January 22, 2021
भाजप आणि राम मंदिर यांचा संबंध म्हणजे पक्षाच्या स्थापने पासून आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातुनपुढे आलेला भाजप च्या आस्मितेचा आणि निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राम मंदिर आणि श्री राम होय. मात्र यामध्ये भाजपकडून नेहमीच फक्त श्रीरामांचे गुणगान गायले जाते. श्रीरामांच्या पत्नी सीतेचा यामध्ये कधी ही उल्लेख नसतो. यावरून प्रियंका यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण… अजितदादांना राणेंचा टोला
- राज्यात आज २१ हजार ६१० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- बेकायदेशीर बॅनर छापणाऱ्यांनो आता सावधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
