औरंगाबाद : शहरातील बॅनरबाजीवरुन नुकतेच मोठे वादंग निर्माण झाले होते. मनपा प्रशासनाने अशा पोस्टरबाजांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच आता बॅनर छापणारे व्यवसायिकांवर देखील जबाबदार असणार आहे. त्यामुळे बॅनरवरील मजकुर छापण्यापुर्वी त्याची खातरजमा करणे, पोलिसांना माहिती कळविणे त्यांना अनिवार्य असणार आहे. शुक्रवारी (दि.२२) शहरातील बॅनर छापणा-या व्यवसायिकांची पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली असून, त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आतापासूनच बॅनरबाजीला सुरूवात झाली आहे. या बॅनरबाजीतून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. वाढदिवस, जातियवादी संघटना, अभिनंदन, पदाधिका-यांची निवड इत्यादी विषयांचे डिजीटल बॅनर झळकावून शहरातील राजकारण तापवले जाते. त्यामुळे बॅनर छापून देण्यापूर्वी त्यावरील मजकुराची खात्री करुन घ्यावी. बॅनरच्या किती प्रत छापण्यात आल्या. बॅनरवर छापून घेणाऱ्यांचे नाव तसेच स्वत:च्या प्रिंटींग प्रेसचा नाव व पत्ता इत्यादी बाबी त्यात नमुद असणे गरजेचे आहे.
तर तत्काळ पोलीसांना कळवा
व्यावसायिकांनी बॅनर छापल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. असे समजताच त्याबाबतची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी. तसेच व्यावसायिकांनी देखील बॅनर छापताना दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलीस आयुक्तालयातील बैठकीत विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी केले. या बैठकीसाठी शहरातील ३० ते ४० बॅनर व्यावसायिक हजर होते.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण… अजितदादांना राणेंचा टोला
- राज्यात आज २१ हजार ६१० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- ठाकरे सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना वेडयात काढले?


