🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यामध्ये भाजपने आपले पक्षीय बलाबल पणाला पणाला लावले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध मोदी अशी निवडणूक होत असून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ममता आणि मोदी यांनी एकमेकांवर थेट वार प्रतीवार केला आहे. यावेळी भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी म्हणाले ‘भाजपा निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान आहे,’ असं सांगत त्यांनी विरोधकांच्या भाजप निवडणुकीत मिळत असलेल्या विजयावरील टीकेला उत्तर दिले.
भाजपाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. भाजपा सत्तेत असो वा विरोधी बाकांवर जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. कार्यकर्ते भाजपाला ताकद देतात. जनतेमध्ये राहून काम करतात. पक्षाची ताकद वाढवतात. आपलं आचरण आणि प्रयत्नांनी भाजपा कार्यकर्ते जनतेचं मन जिंकण्याचं काम अविरतपणे करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. असं मोदी यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?
- ‘कोरोना बाधित खेळाडू लवकरच संघात परततील’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- ‘ब्रेक द चेन’ या गोंडस नावाखाली बाजारपेठा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
