Share

चार वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘ही’ परीक्षा तातडीने घ्या; युवासेनेची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे: कोरोना (corona) काळात अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या परीक्षा प्रलंबित झाल्या आहेत त्या परीक्षा (exams) तातडीने घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. अनेक विभागांच्या परीक्षा मागील चार वर्षांपासून झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून (Animal Husbandry Department) घेण्यात येणाऱ्या परीक्षा चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. या परीक्षा तातडीने घेण्यात यावी यासाठी आता युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१७ आणि २०१९ मध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले, पण परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. पदभरती बाबत विद्यार्थ्यांना अद्याप एकही सूचना न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या पदभरतीच्या परीक्षा तातडीने घ्यावी, अशी मागणी युवासेनेचे कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.डी. रजपूत यांच्याकडे केली आहे. या संदर्भात बोलताना पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.डी. रजपूत म्हणाले, प्रलंबित पदभरतीबाबत वित्त विभागकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही पदभरती तातडीने पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. पदभरती पूर्ण होण्यासाठी पशुसंवर्धन विभाग पूर्णतः प्रयत्नशील असल्याचे रजपूत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!