🕒 1 min read
नागपूर : कुणाच्याही दबावात कुणाला त्रास देऊ नका, आम्ही कधी सत्तेत येऊ कळणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार यांना स्वप्न पडायला लागले आहेत, आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासाला खिळ बसली, त्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सत्तेमधील येण्याची स्वप्ने बघू नये,” असे बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टोमणे सभा बंद करून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा, अन्यथा त्यांच्यासोबत सध्या असलेले लोकही साथ सोडून जातील, असा इशारा बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला. त्यांचा पक्ष ‘हम दो, हमारे दो’, या अवस्थेत उरेल, अशी बोचरी टीका देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली.
आमच्याकडे सर्व संस्था होत्या. मात्र, आम्ही सत्तेचा माज केला नाही. आज जे सुरू आहे ते सर्व गलिच्छ राजकारण असल्याचं अजित पवार म्हणाले होते. यावर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यावरुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोले यांना माहिती नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांना सावध होण्याचा इशाराही दिला आहे. “हळूहळू त्यांचे लोक त्यांना सोडून जायला सुरुवात करतील. तेव्हाच त्यांना कळेल की त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आत्ताच सावध व्हावे”, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी अजित पवारांना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
- Abdul Sattar | “महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर”
- Dengue Prevention | डेंग्यू होण्यापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- Jayant Patil । अशोक चव्हाण म्हणत असतील, तर…; जयंत पाटलांचा मोठा दावा
- Abdul Sattar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
