Share

Uday Samant | तो तर महाविकास आघाडीचा मेळावा; उदय सामंतांनी उडवली ठाकरे गटाच्या मेळाव्याची खिल्ली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जोरदार तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर शिवसेना हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे परंपरेनुसार असलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देखील शिंदे गट दसरा मेळावा घेऊन शिवसेनेवर ताबा सांगणार आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी खरी राजकीय मेजवानी असणार आहे.

तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. यानंतर हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र यावरून आता कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत हे बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा मेळावा नाही. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळत आहे आणि काल त्यांच्या गटातील नेते हे भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांचा होणारा हा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नसून हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांवर बोलणं यावेळी टाळलं. निवडणूक आयोगाच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!