Share

भाजपने एकनाथ खडसेंवर अन्याय केला: मंत्री गुलाबराव पाटील

Published On: 

जळगाव : भारतीय जनता पक्षाने काल राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षवाढीचे काम करणाऱ्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा काल केली आहे. यामध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत परळी विधानसभेत विजय मिळवला होता. तर, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होत. यानंतर राजकीय पुनर्वसनावरून पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाशी विसंगत काही भूमिका देखील केल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या महाराष्ट्रातील या चेहऱ्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड करण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करून त्यांना सक्रिय करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून आलं आहे. तर, नाथाभाऊंना परत एकदा पक्ष नेतृत्वाने हुलकावणी दिल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज यावर भाष्य केले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नाथाभाऊ अद्याप उपेक्षितच!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त पसरले होते, जे त्यांनी नाकारत भाष्य करण्यास टाळले होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!