🕒 1 min read
बीड: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी हितांना दिसत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेले नाहीये त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत विशेषतः लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने सर्वत्र तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्याला ८ बाय-पॅप मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता त्याची पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा रूग्णालयासाठी ४ व लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटरला ४ अशा एकूण ८ बाय-पॅप मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते या मशिन प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका व्यक्त केला जात असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या बायपॅप मशिन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिते व स्त्री रूग्णालयाच्या (स्वतंत्र कोवीड सेंटर) अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे यांच्याकडे हे उपकरणं सोपवण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक योगेश नवले व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
- …म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
