मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या दिवसापासुन वर्चस्व गाजवले होते. मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाने सावध फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आणि पराभव टाळला. मात्र या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर सर्व स्तरातुन टिका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटु वसीम जाफरनेही ही संधी सोडली नाही. पहिला सामना अनिर्णीत राखल्यानंतर जाफरने इंग्लंडच्या संघाला उद्देशुन हेराफेरी चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर ‘क्या गुंडा बनेगा रे तु’ असा संवाद लिहीलेला होता. या ट्विटमध्ये जाफरने,’घरच्या मैदानावर ३.६च्या धावगतीने लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न नाही करणार तर कधी करणार’ असे लिहीले आहे.
If you won't even try to chase a target of 3.6 an over at home with no WTC points at stake, when will you ever try? Not a good advert for test cricket???? #EngvNZ@ECB_cricket pic.twitter.com/K4qzAhoe7L
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 6, 2021
इंग्लंडचे हे कृत्य कसोटी क्रिकेटसाठी शोभनीय नाही असेही या ट्विटमध्ये जाफर म्हणाला. या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने इंग्लंडच्या संघाने साधा प्रयत्नही केला नाही. इंग्लंडचा संघ पहिल्या चेंडुपासुनच सामना अनिर्णीत राखण्यासाठी खेळत होता. २७३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडला ३ च्या धावगतीने खेळण्याची अवश्यक्यता होती. मात्र इंग्लंडने बचावात्मक पवित्रा घेत ३ गडी गमावत १७० धावापर्यंत मजल मारत सामना अनिर्णीत ठेवला.
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल
- ‘स्वीगी’ने विचारलं, ‘जेवलीस का? पोरा-पोरींचे भन्नाट रिप्लाय वाचून हसून हसून व्हाल लोटपोट
- ‘आम्ही आकडे लपवलेले नाहीत,मात्र जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे’
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई – आशिष शेलार


