Share

परीक्षा न देता रेल्वेत नोकरीची मोठी संधी;अर्ज पाठवण्याची 24 जुनपर्यंत मुदत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या ३५९१ रिक्त पद असल्याने आता यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्ती rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे अर्ज पाठवू शकतात. तर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २४ जुन २०२१ असणार आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या तारखेच्या आत फॉर्म भरावा लागणार आहे.

पात्रता
१) या पदासाठी उमेदवार १५ ते २४ वर्षे वयोगटातील असावेत. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
२) उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50% गुणांसह दहावी परीक्षा दिली असावी.

वेतन

१) अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना १ वर्ष प्रशिक्षण दिली जाईल.

२) संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी वेतन दिले जाईल

निवड प्रकिया-
१) अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल.
२) आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

या पदासाठी मुंबई डिव्हिजन 738, वडोदरा डिव्हिजन – 489,अहमदाबाद डिव्हिजन 611,राजकोट डिव्हिजन 176 अशा विविध भागात रिक्त जागा असल्याने या पदासाठी एकूण ३५९१ रिक्त पद आहेत. याबाबतच्या अधिक महितीसाठी वरील लिंकला भेट द्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!