मुंबई : १९ मार्च हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचं औचित्य साधून काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आदी विषयांवरून त्यांनी केंद्रावर टीका करताना मोदी सरकारची तुलना कुंभकर्णाशी केली आहे.
‘शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. मात्र, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’ अशी टीका जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.
पाटील यांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पाटील यांना चांगलेच खडेबोल सुनावले. राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल असं भातखळकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल. pic.twitter.com/gsoaaiiV51
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
दरम्यान,राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गृह विभाग सांभाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कामगिरी तर अतिशय सामान्य राहिल्याचे दिसून येत आहे.मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीनंतर आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

