मुंबई – महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कोविडचे सर्व नियम पाळत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे असल्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
कोविडचा धोका ओसरत असताना भ्रष्टाचाराचा अजेंडा रेटण्यासाठी @mybmc च्या वैधानिक समितीच्या बैठका आभासी पद्धतीने घेणाऱ्या आणि पत्रकारांना इथे प्रवेश नाकारणाऱ्या महापौर @KishoriPednekar यांच्या दालनासमोर आज भाजप नगरसेवकांनी तीव्र निदर्शने केली. १/२ pic.twitter.com/x54QSYVywe
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) September 22, 2021
महापालिका सभा व सर्व वैधानिक समित्यांच्या सभा आभासी पद्धतीने होत असल्याने पत्रकारांनाही या सभांमध्ये सहभागी होता येत नाही. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही पत्रकारांना सभांमध्ये आभासी पद्धतीने आजवर सहभागी करून घेतलेले नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार तुम्हाला महापालिका सभेत का नको आहेत ? असा सवाल करत पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी महापालिकेच्या वैधानिक समिती व विशेष समिती सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात याव्यात तसेच सर्व सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनंत गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही; पवारांवरील टीकेमुळे संजय राऊत व्यथित ?
- मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- ‘महाराष्ट्राची परंपरा आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिले नाही?’, चंद्रकांतदादांचा काँग्रेसला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

