सांगली : आज १२ डिसेंबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. आज शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे.
सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनेक नेत्यांनी पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवारांचा वाढदिवस यंदा कोरोनाच भान राखून समाज उपयोगी कामांद्वारे साजरा केला जात असतानाच भाजपने सांगलीमध्ये पवारांच्या जन्मदिवसाला अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ‘राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन’ असे फलक घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीतील गरवारे महाविद्यालयासमोर निदर्शनं केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार
- शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या दानवेंचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवला
- सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत घरकुल मिळेल यासाठी नियोजन करा : भरणे
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- रावसाहेब दानवे यांनी देशातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागावी : शिवसेना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
