Share

BJP | भाजपच्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली वेदांता फॉक्सकॉन प्रकरणाच्या चौकशीची मागणी

Published On: 

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यामुद्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा प्रकल्प गुजरातला जाणं हे शिंदे-फडणवीसांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. तर काही विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अशातच एका नेत्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अश्चर्याची बाब म्हणजे मागणी करणारा नेता विरोधी पक्षनेता नसून, चक्क भाजप पक्षाच्याच एका नेता असल्याचं समजतं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप पक्षाच्या नेत्यांने केली चौकशीची मागणी –

चौकशीची मागणी करणारा नेता दुसरा-तिसरा कोणी नसून भाजप पक्षाचे नेते आशिष शेलार आहे. अशिष शेलार यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय प्रयत्न केले?, उद्योग विभागाने कोणत्या सवलती व अनुदान देऊ केले होते? उद्योगमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या आणि गुजरातमध्ये किती वेळा बोलाविले गेले?, याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी एकनाथ शिंदे केली आहे.

तसेच, करोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठय़ात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी हा प्रकल्प भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यावर विरजण टाकण्याचे काम शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांची सेना करीत असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी याठिकाणी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मागणी केली आहे. वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!